प्रश्न : विवाह प्रसंगी, मुलाला मुलीच्या उजव्या बाजूला व मुलीला मुलाच्या डाव्या बाजूलाच का उभे करतात ?

उत्तर : अकौंटन्सीच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून.

बायको म्हणजे बायकोच...
.
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
.
पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...
.
मधेच बायकोचा आवाज आला...

 घरातच फिरा...
.
ती समोरची  गावाला गेली आहे..
नवरा :-  कुठे गेली होतीस?? 

बायको :-  रक्तदान करायला...

नवरा  :-   पीत होतीस तो पर्यत ठिक होतं.... आता विकायला पण लागलीस? ..!

नवरा : वटपौर्णिमेचा उपवास आहे ना?? 
बायको : हो..
नवरा : काही खाल्ल ?
बायको: हो..
नवरा : काय ?...
बायको: केळ, सफरचंद,डाळिंब ,शेंगदाणे, फ्रूट क्रीम, आलूची टिक्की, साबूदाण्याची खीर, साबूदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स, राजगीरीचे लाडू, साबुदाण्याची खिचडी, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता जूस पीत आहे...
नवरा - खूपच कडक उपवास करत आहेस…हे सगळ्यांना जमत नाही.. अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे.. बघ नाहीतर उपवासाने चक्कर येईल...!!
नवरा - "तीन दिवस झाले वांग्याची भाजी
खातोय... वैताग आलाय... आता महिनाभर तरी
खाणार नाही मी, वांग्याची भाजी..."
.
.
.
बायको - हीच गोष्ट दारुसाठी बोला ना... रोज
रोज ढोसून येता.... मला पण वैताग आलाय
तुमच्या पिण्याचा....
.
.
.
नवरा - बनव उद्या पण वांग्याची भाजी....
मस्त बनवतेस तू. 
वसंत - डॉक्टर माझी बायको गेल्या बारा तासांपासून एकही शब्द बोलत नाही.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर - मग तुम्ही माझ्याकडे का आलात? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांकडे जा. 

नवरा- माझ्या छातीत खुप दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस ला फोन लाव...

बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल चा पासवर्ड
सांगा !!!

...

नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय मला आता....!!!

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..

बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.

नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो..

पुणेरी सून.

सुन - सासूबाई तुमचे सगळे दागिने मला दया.
सासु - मग मी काय घालू ??
सुन - तूम्ही सूर्यनमस्कार घाला. 


"उत्तम आरोग्य हाच खरा दागिना..."

गणपतराव : काय हो , वसंतराव तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली ? 
वसंतराव : कारागृहामध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना . 
गणपतराव : असं होय , सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवलीयं तर !

 

1 2 3 4

Search Terms :
Husband-Wife jokes in Marathi, Marathi jokes, Husband-Wife jokes, Husband-WifeJokes in Marathi, Husband-Wife Marathi jokes, Jokes